2Pune_AAI_donates_equipment_0.jpg
2Pune_AAI_donates_equipment_0.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

तिच्यातील आईने घेतले रौद्ररुप ; दोन तासातच केली बाळाची सुटका 

सरकारनामा ब्युरो

पुणे : तीन महिन्यांच्या बाळाला परिचारिकेचा गणवेश घालूत आलेल्या एका महिलेने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी ससून रूग्णालयात  Sassoon Hospital घडला. डोंगराऐवढे संकट कोसळले असतानाही बाळाच्या आईने धीर सोडला नाही, रिक्षातून तिचा पाठलाग केला आणि एक-दोन तासातच महिलेस चंदननगर परिसरात गाठून बाळाची सुखरुपपणे सुटका केली. त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. 

वंदना मल्हारी जेठे (वय 24, रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कासेवाडी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिला तिचे तीन महिन्यांचे बाळ श्‍वेता हिला घेऊन दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. त्यावेळी महिलेची मैत्रीणही तिच्या बाळाला घेऊन तिच्यासमवेत दवाखान्यात आली होती. 

पोलिसांसाठी गुड न्यूज ; डीजीपी पांडेंनी घेतला महत्वाचा निर्णय 
महिलेची मैत्रीण तिचे पती आजारी असल्यामुळे गेली. फिर्यादी महिला ससूनमधील वॉर्ड क्रमांक 74 मध्ये येथे थांबल्या होत्या. त्यावेळी परिचारिकेसारखा गणवेश घातलेली महिला तिच्याकडे आली. तिने फिर्यादी महिलेस तुमच्या नातेवाईकांनी बोलावले आहे, तुम्ही जा मी बाळाला सांभाळते, असे संगितले. ती महिला परिचारिका असल्याचे समजून फिर्यादीने त्यांच्या बाळाला तिच्याकडे विश्वासाने सोपविले. 

त्यानंतर त्या त्यांना भेटण्यासाठी कोण आले आहे, हे पाहण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी आजूबाजुला पाहिले, तेव्हा त्यांना कोणीही नातेवाईक आढळले नाहीत. त्यामुळे त्या तत्काळ वॉर्डमध्ये परतल्या. तेव्हा त्यांना संबंधीत परिचारीका व त्यांची मुलगी तेथे आढळून आली नाही. अचानक घडलेल्या या घटनेनंतर फिर्यादीने हंबरडा फोडला. त्यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी व सुरक्षारक्ष तेथे धावून आले. महिलेने घडलेली घटना सांगितल्यानंतर रुग्णालय प्रशासनानेही तत्काळ बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली. संबंधीत महिला गृहीणी असून तिच्या लग्नास सात वर्ष झाली आहेत. मात्र तिला अद्याप मुल झाले नाही. त्यामुळे तिने ससूनमधून बाळ पळवून नेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT