मुख्य बातम्या मोबाईल

आमदार मकरंद पाटलांच्या एन्ट्रीमुळे शिवेंद्रसिंहराजे टेन्शनमध्ये!

सरकारनामा ब्युरो

सातारा : राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता बँकेचे सत्ताकारण बदलून जाणार आहे. शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे आठ संचालक बँकेत असल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही बँक भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादीचे वाई मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांची बँकेत संचालक म्हणून निवड झाल्याने ते नव्याने चाली खेळू शकतात. 

बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्याने त्यांना मानणारे संचालकही त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार का, हे अजून स्पष्ट झाले नसलेतरी तसे घडू शकते. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग प्रतिनिधी प्रकाश बडेकर, महिला प्रतिनिधी
कांचन साळुंखे, तज्ज्ञ संचालक वसंतराव मानकुमरे, औद्योगिक विणकर व मजूर संस्था, ग्राहक आणि पाणीपुवठा तसेच व्यक्तीगत सभासदांतून आलेले अनिल देसाई, कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेतून आलेले दादाराजे खर्डेकर, सोसायटी मतदारसंघातील प्रभाकर घार्गे हे संचालक शिवेंद्रराजेंच्या गोटातील मानले जातात. यातील अनिल देसाई हे यापूर्वीच
भाजपमध्ये गेलेले आहेत. परिणामी शिवेंद्रसिंहराजे यांची बाजू सद्यातरी भक्कम दिसत आहे. 

मुंबईत आज शिवेंद्रसिंहराजे यांचा भाजपप्रवेश होत असताना आज बॅंकेचे दिवंगत संचालक लक्ष्मणराव पाटील यांच्या रिक्त जागेवर त्यांचे पुत्र, वाईचे आमदार मकरंद पाटील यांना घेण्यात आले. त्यातून अविश्‍वास ठरावाच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेत अध्यक्षपद बदलाची प्रक्रिया सुरू झाल्यचे संकेत देण्यात आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT