Security of TMC leader Mukul Roy has been withdrawn
Security of TMC leader Mukul Roy has been withdrawn 
मुख्य बातम्या मोबाईल

'घरवापसी' करताच भाजपने मुकुल रॅाय अन् मुलाला दिला झटका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) व त्यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वीच घरवापसी केली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच भाजपने मुकुल रॅाय यांना झटका दिला आहे. (Security of TMC leader Mukul Roy has been withdrawn)

घरवापसी करून काही दिवस उलटताच भाजपने रॅाय यांचे 'Z' दर्जाचे सुरक्षा कवच काढून घेतले आहे. बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. बंगाल सरकारने त्यांना त्यापूर्वी 'Y' दर्जाची सुरक्षा पुरवली होती. मुकुल रॅाय यांनीच सुरक्षा कवच काढण्याचे विनंती गृह विभागाला केल्याचे समजते. रॅाय यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.  मागील महिन्यात भाजपने निवडूण आलेल्या सर्व 77 आमदारांना सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे.

मागील काही आठवड्यांपासून रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. मागील काही दिवसांपासून रॉय यांनी मौन धारण केले  होते. सार्वजनिकरीत्या त्यांनी कोणतेही विधान केलेले नव्हते. मात्र, रॉय यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी ते तृणमूलमध्ये परततील, ही शक्यता नाकारली नव्हती. 

दरम्यान, मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये असताना ममतांवर व्यक्तिगत पातळीवरील टीका करणे टाळले, त्यामुळे त्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होतो. याचवेळी सुवेंदू अधिकारी यांनी सातत्याने ममतांना लक्ष्य केले त्यामुळे त्यांचा समावेश जहाल नेत्यांमध्ये होतो. मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे खुले आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण ठरली. त्यानंतरचा त्यांची घरवापसी सुकर झाली. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT