Shamrao Pati
Shamrao Pati 
मुख्य बातम्या मोबाईल

मोहिते पाटलांचा पहिला पराभव केलेल्या शामराव पाटलांचे निधन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्रात 1977 मध्ये गाजलेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून शंकरराव मोहिते पाटील यांचा ऐतिहासिक पराभव केलेले शामराव भीमराव पाटील (वय 87) यांचे आज दुपारी त्यांच्या पाणीव या मूळ गावी निधन झाले. सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील,  हृदयरोग तज्ञ डॉ. सुनील पाटील यांचे ते वडील होत.

राज्याच्या राजकारणात एकेकाळी मोहिते-पाटील विरोधात शामराव पाटील अशी राजकीय स्पर्धा होती त्याची चर्चा 1977 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव मोहिते-पाटलांच्या पराभवानेच झाली. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत श्यामराव पाटील हे त्यावेळच्या जनता पक्षाचे उमेदवार तर मोहिते पाटील काँग्रेसचे उमेदवार होते. 1952 पासून शंकरराव मोहिते-पाटील यांचा पहिलाच पराभव होता. मोहिते पाटील यांच्या या पराभवाची त्यावेळी राज्यात चर्चा झाली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणात 1980 नंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांचा उदय झाला. त्यानंतर सातत्याने मोहिते पाटील यांचेच वर्चस्व तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात राहिले. मात्र, शामराव पाटील यांनी तालुक्यात श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध शाळा महाविद्यालये सुरू केली. शामराव पाटील आणि शंकरराव मोहिते-पाटील यांचे राजकीय वैर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात सत्तरच्या दशकात मोठा चर्चेचा विषय होता. या दोघांच्या राजकारणावर मराठीत लक्ष्मी हा चित्रपट सुद्धा काढला गेला. तो चित्रपट देखील यशस्वी झाला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT