shankersinh vaghela resigns from nationalist congress party
shankersinh vaghela resigns from nationalist congress party  
मुख्य बातम्या मोबाईल

माजी मुख्यमंत्र्याने सोडली राष्ट्रवादी काँग्रेस

वृत्तसंस्था

अहमदाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. वाघेला यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची संधी न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. वाघेला यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. वाघेला हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. 

वाघेला यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राजीनामा पाठविला आहे. यात वाघेला यांनी म्हटले आहे की, तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल स्वत: अहमदाबादला 2019च्या सुरूवातीला आला होतात. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी दिलीत. त्यानंतर माझ्या खांद्यावर पक्षाच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यातून पक्ष आणि राज्याची सेवा करण्याची संधी देण्यात आली. गुजरातमधील जनतेला मी कायम सर्वोच्च स्थानी मानत आलो आहे. 

माझ्यावरील तुमचा विश्वास मी कायम सार्थ ठरविला आहे. प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि पारदर्शी यंत्रणेच्या माध्यमातून मी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला. याचबरोबर संपूर्ण राज्यात तालुका आणि जिल्हा पातळीवर नेतृत्वांची फळी मी तयार केली, असे वाघेला यांनी नमूद केले. 

राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या दिवशीच मी राजीनामा देत आहे. याला सध्याच्या राजकीय घडामोडी आणि पक्षाचे कार्यकर्ते, नेते, तालुका आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांमध्ये पसरलेली निराशा कारणीभूत ठरली आहे. यामुळे पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस, पक्षाचे सदस्यत्व यांचाही राजीनामा देत आहे, असे वाघेला यांनी नमूद केले आहे. 

राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारपदी गायक आनंद शिंदे..?

पुणे : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कलावंतांच्या प्रश्नावर भेट घेतली. ही भेट कलावंतांचे प्रश्न मांडणारी होती. मात्र, या भेटीनंतर आनंद शिंदे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदारपदी संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आनंद शिंदे यांनी कोरोनाच्या काळात कलावंतांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले हे सांगण्यासाठी, कलावंतांच्या व्यथा मांडण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र राज्यपालनियुक्त विधानपरिषद जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आनंद शिंदे यांना संधी मिळणार काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आनंद शिंदे यांनी मोहोळ मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र उत्कर्ष शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण मोहोळमधून यशवंत माने यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT