मुख्य बातम्या मोबाईल

संविधानावर शरसंधान करणाऱ्यांना उद्‌ध्वस्त करा : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर कोणी शरसंधान करणार असेल; तर त्यांना उद्‌ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचे नाही. ही लढाई सोपी नाही; परंतु ती लढल्याशिवाय गत्यंतर नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही लढाई लढल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत दिला. 

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या "संविधान वाचवा, देश वाचवा' कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यप्रणालीवरही जोरदार टीका केली. 

पवार म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीतूनच संविधानाला धोका आहे. मध्यंतरी भाजपचे मंत्री हेगडे यांनी संविधानाविरोधात एक वक्तव्य केले. त्यावर त्यांचे ते वैयक्तिक मत होते, असे सांगण्यात आले; परंतु ती त्यांची निती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांचे विचार त्यांनी स्पष्ट केले होते. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये गोळवलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही शब्दांबाबत शंका निर्माण करतानाच त्या पुस्तकामध्ये घटना ही इतर देशातून उचलून तयार केलेली आहे. ती परदेशाच्या विचारधारेवर आधारित आहे. त्यामुळे ती आपली म्हणण्याचे कारणच नाही असे नमूद केले. 
आता जो आघात होणार आहे तो समाजातील वंचित, शोषित, दलित, अल्पसंख्याक, ओबीसी, महिला यांच्यावर असणार आहे. सत्तेचा वापर करून आघात करणारा वर्ग उभा राहतो आहे, अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT