Sharad Pawar donates Rs 25 lakh to Satav Kovid Hospital in Baramati
Sharad Pawar donates Rs 25 lakh to Satav Kovid Hospital in Baramati 
मुख्य बातम्या मोबाईल

कोविडच्या संकटात बारामतीकरांना दिलासा देणाऱ्यांना पवारांनी दिले बळ!

मिलिंद संगई

बारामती  ः कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असताना सातव कुटुंबीय आणि डॉ. सुनील पवार यांनी धों. आ. सातव कोविड हॉस्पिटल सुरू करून बारामतीकरांना दिलासा दिला. त्या हॉस्पिटलला कोरोनाविरोधात लढण्यासाठी आर्थिक बळ मिळावे; म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २५ लाख रुपयांची मदत दिली. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्याकडे तो धनादेश पवारांनी सुपूर्त केला. (Sharad Pawar donates Rs 25 lakh to Satav Kovid Hospital in Baramati)

शरद पवार देशभरात कुठेही असले तरी त्यांची बारामतीकडे बारीक नजर असते. बारामती आणि शरद पवार हे एक प्रकारचे अतूट समीकरण गेल्या ५० ते ६० वर्षांत बनलेले आहे. त्याचे दर्शन कायम घडत असते. विधायक कामाच्या बाबतीत तर पवार नेहमी आग्रही असतात. तशा स्वरूपाचे काम करणाऱ्याच्या पाठीशी ते खंबीरपण उभे राहतात. आताही कोरोनाच्या काळात बारामतीकरांना बेडची टंचाई भासू नये, यासाठी काम करणाऱ्या सातव कोविड हॉस्पिटलला मदत करून समाजोपयोगी कामाला एक प्रकारचे बळ त्यांनी दिले आहे. 

गेल्या महिनाभरात बारामती शहारात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनलेली होती. ऑक्सिजनच्या बेडची कमतरता भासत होती, त्या वेळी सातव कुटुंबीय व डॉ. सुनील पवार यांनी धों. आ. सातव कोविड हॉस्पिटलची उभारणी केली. या हॉस्पिटलमध्ये 30 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करुन दिले आहेत. या ठिकाणी डॉक्टर व नर्सिंग स्टाफ 24 तास उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तातडीने उभारलेल्या या हॉस्पिटलचा कोरोनाच्या पीक पिरियडमध्ये चांगला उपयोग झाला. आजपर्यंत 300 रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. 

दरम्यान, या कोविड हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आयसीयू व्यवस्था, वेळेवर औषधे, सकस व दर्जेदार आहार, स्वच्छता, पिण्यासाठी आरओ सिस्टीमचे पाणी, तसेच मनोरंजनासाठी टिव्ही, सॅनेटायजिंग करणारे फॅन येथे बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय माळेगाव कॉलनी येथील प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

सदाशिव सातव हे मुंबईत ज्यावेळी शरद पवारांना भेटले, त्यावेळी त्यांना कोविड हॉस्पिटलबद्दलची माहिती मिळाली. त्यानंतर शरद पवार यांनी सदाशिव सातव यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडे 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी बारामती नगरपालिकेतील गटनेते सचिन सातव, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव, नगरसेवक सूरज सातव आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT