मुख्य बातम्या मोबाईल

पंतप्रधान मोदींना शरद पवार यांचे साखर परिषदेच्या उद्घाटनासाठी निमंत्रण

सरकारनामा ब्युरो

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पुढील वर्षी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटनासाठी येण्याचे निमंत्रण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. 

खासदार शरद पवार यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या वेळी त्यांनी मोदींना आंतरराष्ट्रीय साखर परिषदेला येण्याचे निमंत्रण दिले. पुढील वर्षी 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 दरम्यान पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही परिषद होत आहे. `सस्टेनॅबिलिटी, इनोव्हेशन अॅण्ड डायव्हरसिफिकेशन इन शुगर अॅण्ड अलाइड इण्डस्ट्री' या विषयावर ही परिषद होत आहे. परिषदेदरम्यान प्रदर्शनही आयोजिल्याची माहिती ट्विटद्वारे खासदार पवार यांनी दिली आहे.

याच संस्थेने 2016 मध्ये आयोजिलेल्या परिषदेचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्तेच झाले होते. त्यावेळी 22 देशांमधून दोन हजार प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेतील प्रदर्शनाला सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी भेट दिल्याचेही मोदींना दिलेल्या निमंत्रणात पवार यांनी नमूद केले आहे.  पुढील वर्षी होणाऱ्या परिषदेलाही 2500 प्रतिनिधी विविध देशांतून उपस्थित राहणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT