Sharad Pawar Meeting with Opposition leaders in New Delhi
Sharad Pawar Meeting with Opposition leaders in New Delhi 
मुख्य बातम्या मोबाईल

शरद पवारांच्या प्रशांत किशोर अन् विरोधकांशी भेटीमागचं प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांनी सोमवारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यानंतर आज विविध 15 विरोधी पक्षांची पवारांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीचीही बैठक झाली. या बैठक सत्रांमागे कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Sharad Pawar Meeting with Opposition leaders in New Delhi)

एकीकडे राज्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून शरद पवारांच्या भेटीबाबत उत्सुकता वाढविणारी वक्तव्ये केली जात आहेत. आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवारसाहेब करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सोमवारी सांगितले होते. 

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवारसाहेबांची भेट घेतली होती आणि सोमवारी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होते.

या बैठकांवर आज पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी खुलासा केला. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीमध्ये पक्षांतर्गत निवडणूकीवर चर्चा झाली. कोरोनामुळे या निवडणुका लांबल्या आहेत. या निवडणुका कधी घ्यायचे यासंदर्भात चर्चा झाली. तर कालची शरद पवार व प्रशांत किशोर यांची सदिच्छा भेट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रशांत किशोर यांची भेट आणि आज होणारी राष्ट्र मंचाची बैठक या दोन्ही राजकीय घडामोडींमध्ये काही संबंध नाही. शरद पवार यांच्याकडून कुणालाही आमंत्रण गेलेले नाही. राष्ट्र मंचाच्या नेत्यांनी आमंत्रण देऊन बोलावलं आहे, असेही पटेल यांनी सांगितले. दरम्यान, आजच्या विरोधकांच्या बैठकीला आप, तृणमूल काँग्रेस यांसह विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT