sharad pawar
sharad pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

सरनाईक यांच्या `लेटरबाॅंब`चे दिल्लीत पडसाद : शरद पवार तेथूनच सूत्रे फिरवणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाविकास आघाडीतील धुसफुस आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या पत्रानंतर उघड झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार (Sharad Pawar) हे दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होणे स्वाभाविक आहे. 

दुपारच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले. केरळमधील प्रमुख नेते शरद पवार यांना भेटणार आहेत, अशी चर्चा आहे. पवार यांच्या कानावर सरनाईक यांच्या पत्रातील मजकूर गेल्यानंतर ते दिल्लीत पोहोचले आहेत. या पत्रात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची कामे होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेच्या आमदारांना फारशी किंमत नसल्याचा सूर आळवण्यात आला आहे. त्यामुळे पवार यावर काय बोलणार, याची उत्सुकता आहे.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या शिष्टमंडळातील काही नेतेमंडळी सुद्धा उपस्थितीत होती. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात खासगी बैठक सुद्धा झाली. राज्यातील महाविकास आघाडी मध्ये कोणतेच मतभेद नसल्याचे वारंवार स्पष्टीकरण दिले जात होते. मात्र आजच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. काही दिवसांपूर्वीच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरदपवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुद्धा जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. 

सरनाईक यांच्या पत्रावर पटोले काय म्हणाले?  

राज्यात पाच वर्षांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे युती सरकार स्थापन झाले, ही काय कायमस्वरूपी युती नाही, असे नाना पटोले यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.  ते म्हणाले की, स्वबळाचा नारा लावणे चुकीचे नाही. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. असा नारा दिल्याने महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 5 वर्षांसाठी युती सरकार स्थापन करण्यास शब्द दिला आहे, त्यामुळे कॉंग्रेस 5 वर्षांसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये असेल.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भाजपशी जुळवून घ्यावे या प्रताप सरनाईक यांच्या सल्ल्यानंतर भाजप नेत्यांनी थेट मत व्यक्त केले नसले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सावध भूमिका व्यक्त केली. भाजपशी युती करण्याची अनेकांची इच्छा असू शकते. पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडतोय. `सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणू आम्ही निवडून आलो होतो. पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ.भाजप स्वबळावरच लढतोय. महाआघाडीत कुणी कोणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT