Sharad Pawar, Mamata Banerjee .jpg
Sharad Pawar, Mamata Banerjee .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

शरद पवारांनी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला; ममतांच्या मदतीला जाणार

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात चुरशीची लढत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उतरणार आहेत. पवार लवकरच बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते 1 ते 3 एप्रिल पश्चिम बंगालमध्ये फिरून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार करणार, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

पश्चिम बंगामध्ये भारतीय जनता पक्ष व तृणमूल काँग्रेसमध्ये अटितटीची लढत होत आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे देशातील अनेक नेते प्रचारात उतरले आहेत. त्यातच ममता बॅनर्जी यांनाही देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळेच शरद पवार बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. बंगालमध्ये फिरून विविध ठिकाणी प्रचार करणार आहेत. ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या भवनामध्ये पक्षाच्या कार्यकत्यांशी पवार संवाद साधनार आहेत, अशी माहिती तापसे यांनी दिली आहे.  

बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान

बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभेची मतमोजनी होणार आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने प्रचार करु नये, अशी विनंती काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली होती. काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील नेते आणि राज्यसभा खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी तसे पत्र शरद पवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांना लिहले होते. तुम्ही बंगालच्या प्रचारापासून दूर राहावे, अशी विनंती भट्टाचार्य यांनी दोन्ही नेत्यांना केली होती. 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. त्यामुळे तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात बॅनर्जी यांच्या बाजूने प्रचार करु नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले होते. मात्र, काँग्रेसच्या या मागणी नंतरही पवार प्रचारासाठी जाणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT