Praveen Darekar .jpg
Praveen Darekar .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

शरद पवार यांना नक्कीच हे पुस्तक पाहून मोठेपणा वाटेल : प्रवीण दरेकर 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मावळात २०११ ला शेतकऱ्यांवर गोळीबार करून तीन शेतकऱ्यांना ठार करणारे केंद्र सरकारला सांगत आहेत. बळाचा वापर करू नका. कुठल्या तोंडाने आपण हे सांगत आहात, असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला आहे.  

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, बळाचा वापर झाला असता तर आमचे ८३ पोलीस जखमीच झाले नसते. दहा बालक जळून मृत्यूमुखी पडली त्यावेळी दिले का राजीनामे, त्यामुळे मोदींचा राजीनामा मागण्यासाठी नैतिक जबाबदारी किंवा तोंडही दाखवायला जागा नाही. असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. 

मला शरद पवार यांच्या बद्दल आदर आहे. मला खंत याची वाटते विरोधी पक्षनेते या पदाचा मला कमी पणा वाटतोय असं पवार बोले होते. मात्र मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्या कामाचा लेखा जोखा मी माझ्या पुस्तक रुपाने मांडतोय. शरद पवार यांना नक्कीच हे पुस्तक पाहून मोठेपणा वाटेल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. 

प्रवीण दरेकर वर्षभराचा लेखाजोखा सादर करणार...

प्रविण दरेकर यांनी त्यांच्या विरोधी पक्ष नेते म्हणून वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा घेणा-या 'वर्षभराचा लेखाजोखा' या पुस्तकाचे प्रकाशन ( गुरुवार ता. २८ जानेवारी ) रोजी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

हे ही वाचा...

आता जर काही घडले नाही, तर काय होईल हे मला माहिती नाही
  
नरीमन पॉईंट येथील यशवंत चव्हाण केंद्र येथे सायंकाळी ४.०० वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रविण दरेकर यांच्या विधान परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून वर्षपूर्तीचा आलेख 'वर्षभराचा लेखाजोखा' या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशन सोहळाच्या निमित्ताने लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत 'महाराष्ट्राचे लोक संगीत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प. पू सदगुरू दादा  महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT