Sharad Pawar's interview is 'Nura Kusti': Fadnavis
Sharad Pawar's interview is 'Nura Kusti': Fadnavis 
मुख्य बातम्या मोबाईल

शरद पवारांची मुलाखत म्हणजे 'नुरा कुस्ती' : फडणवीस 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गेल्या दोन दिवसांपासून "सामना'तून मुलाखत प्रसिद्ध होत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्‍सिंग, नुरा कुस्ती असल्याची टीका केली आहे. 

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही टीका केली आहे. पत्रकारांकडून फडणवीस यांना "भाजपला सत्तेचा दर्प चढला होता. बाळासाहेबांची शैली भाजपशी सुसंगत नव्हती. मागील सरकार हे युतीचे नव्हते, तर फक्त भाजपचे होते,' असा आरोप शरद पवार यांनी केला आहे, असा प्रश्‍न विचारण्यात आला. 

त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही डब्ल्यूडब्ल्यूएफची कुस्ती बघितली आहे का? तसेच, पूर्वीच्या काळी नुरा कुस्ती व्हायची. त्याला मॅच फिक्‍सिंग असे म्हणतात. तसं हे मॅच फिक्‍सिंग चाललं आहे, ते आणखी एक दिवस चालणार आहे. ते मॅच फिक्‍सिंग एकदा संपू द्या. त्यावर मी योग्य वेळी उत्तर देणार आहे. 

कोरोनाविरोधात लढाई सुरू असताना विरोधी पक्षाकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, या आरोपालाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. 

त्याबाबत ते म्हणाले की, स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं, अशी एक पद्धत आहे. कारण, ती पद्धत अवलंबली तर आपल्या अपयशापासून जनेतची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार आहे. कोणीही सरकार पाडत नाही. आपणच कांगावा करायचा, सरकार पाडले जात आहे, सरकार पाडले जात आहे. त्याच्यावरच मुलाखती करायच्या, त्यावरच बोलयाचं. जेणेकरून खरी कोरोनाविरोधातील लढाई, प्रश्‍न आहेत, त्याकडे जनतेचे दुर्लक्ष होईल. पण, मला असं वाटतंय की त्यांनी कोरोनाविरोधातील लढाईकडे लक्ष दिलं पाहिजं. 


पृथ्वीराज जाचकांची घरवापसी निश्चित? अजित पवारांशी जुळवून घेणार!

बारामती : पंचक्रोशीतील महत्वाची संस्था असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे राजकारण आगामी काळात वेगळ्या वळणावर जाणार आहे असे दिसते. कारखान्याचे माजी अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या हिताचा विचार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या माहितीला अधिकृत दुजारो मिळालेला नसला तरी अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पृथ्वीराज जाचक व किरण गुजर या चौघांची नुकतीच एक गोपनीय बैठक पार पडल्याचे समजते. या बैठकीत जाचक यांनी अजित पवार यांच्या समवेत छत्रपती साखर कारखान्यात कार्यरत व्हावे असे सांगण्यात आले आहे. आगामी निवडणूकीमध्ये त्यांना सन्मान्य जागा देण्याचा शब्द पवार यांनी जाचक यांना दिल्याचे समजते. 

आगामी काळात एकत्रित काम करावे असा विचार करत पृथ्वारीज जाचक व अजित पवार यांनीही समन्वयाची भूमिका घेतली आहे. छत्रपती कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा विचार करुन ही भूमीका घेतली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या मुळे लॉकडाऊननंतर जी निवडणूक होईल, त्यात चित्र काहीसे वेगळे दिसेल अशी चर्चा आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT