shashikant shinde elected unopposed
shashikant shinde elected unopposed 
मुख्य बातम्या मोबाईल

मुंबई बाजार समितीवर शशिकांत शिंदे बिनविरोध

सरकारनामा ब्युरो

सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हमाल (माथाडी) व तोलणारी या मतदारसंघातून माथाडी नेते व कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी हमाल (माथाडी) व तोलणारी या मतदारसंघातून माथाडी नेते शशिकांत शिंदे यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्‍चित झाले आहे. शुक्रवारी (ता. 31) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यादिवशी व्यापारी मतदारसंघातील आणखी तीन ते चार जागा बिनविरोध होतील, असा विश्‍वास माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT