shekhar-gaikwad
shekhar-gaikwad 
मुख्य बातम्या मोबाईल

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी शेखर गायकवाड; इतर 19 अधिकाऱ्यांच्याही बदल्या....

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असलेल्या महापालिकेत आता मुंडे यांना पाठवून महाविकास आघाडीने मोठा दणका भाजपला दिला आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून यांना नेमण्यात आले आहे.

मुंडे हे फडणवीस यांचे लाडके अधिकारी होते. त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुणे परिवहन लिमिटेड, नाशिक पालिका आयुक्त येथे फडणवीस यांच्या काळात काम केले. मात्र लोकप्रतिनिधींच्या नाराजीमुळे मुंडे यांच्या वारंवार बदल्या झाल्या. राज्य सरकारने आज सोळा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. 

गायकवाड यांनी राज्याचे भूजल संचालनालयाचे संचालक, तसेच साखर आयुक्त म्हणून विविध उपक्रम राबविले. शेतकऱ्यांना उसाची एफआरपी मिळण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. तसेच शेतकऱ्यांत जागृतीसाठी पुस्तिकाही काढली होती. 

राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांना सहकार आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. संपदा मेहता सहआयुक्त विक्रिकर, रणजितसिंह देओल हे मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक, प्राजक्ता लवांगरे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांची उत्पादनशुल्क आयुक्तपदी बदली झाली. आनंद रायते यांची अतिरिक्त पुनर्वसन सचिव म्हणून नियुक्ती झाली. मत्स्यविकास आयुक्त  आर. आर. जाधव यांना उपमुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून जबाबदारी मिळाली आहे. ओमप्रकाश देशमुख हे नवी नोंदणी महानिरीक्षक असतील. आयुषप्रसाद यांची पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम पाहतील. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ यू. ए. जाधव हे अकोल्याचे सीईओ म्हणून काम पाहतील.

 पराग जैन यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी बदली झाली आहे. या विभागाचे सचिव दिनेश वाघमारे महापारेषण कंपनीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.आर. डी. निवटकर यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT