2Sarkarnama_20Banner_20_202021_03_31T135047.607.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_03_31T135047.607.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

नारायण राणेंचा व्यवसाय कोंबडी चोरण्याचा!

सरकारनामा ब्युरो

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी आंदोलनात सुरवात केली आहे. आंदोलकांनी कोंबड्या आणल्या आहेत. नारायण राणे यांचा व्यवसाय कोंबडी चोरण्याचा आहे, अशी खोचक टीका अंबादार दानवे यांनी केली आहे. मुंबई येथेही ''कोंबडी चोर नारायण राणे' यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. 

पुणे, नाशिक, महाड येथे राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जमीनासाठी राणे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांमध्ये काल रात्री झाली चर्चा करण्यात आली. राणेंनी केलेली वक्तव्यावर आता भूमिका घेतली नाही तर जनतेच संदेश वाईट जाईल, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. शिवसैनिकांना कायदा हातात न घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्याची माहिती आहे. 

राणे Narayan Rane यांनी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीका केली आहे.मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. यावरुन शिवसेना आणि राणे यांच्यात वाद पेटला आहे.  ''नारायण राणे सध्या ऑक्सिजनवर आहे त्यांची हवाही शिवसेनेने काढलेली आहे. शिवसेनेवर टीका करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे, त्याच्यामुळे नारायण राणे काय करतात याची आम्हाला अजिबात चिंता नाही,'' या शब्दांमध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली आहे.

मुंबई : ''माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही. कोण सुधाकर बडगुजर? त्यांनी मी ओळखत नाही. काही माध्यमांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी बदनामी करणाऱ्या माध्यमांवर मी गुन्हा दाखल करेल, असा इशारा त्यांनी दिला.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT