Devendra Fadnavis, Sanjay Gaikwad .jpg
Devendra Fadnavis, Sanjay Gaikwad .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

जर मला कोरोनाचा जंतू सापडला असता तर फडणवीसांच्या तोंडात कोंबला असता!  

सरकारनामा ब्यूरो

बुलडाणा : मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. फडणवीस यांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही गायकवाड यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते.

फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरु आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपाची मंडळी खिल्ली उडवीत आहे. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोफत वाटले. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला गायकवाड यांनी फडणवीसांना लगावला आहे.

जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केले आहे. ज्याचा घरातील माणूस कोरोनाने मरतो त्यालाच माहित कि कोरोना काय आहे. मात्र भाजपवाल्यांना याची जाण नाही. तसेच कोरोनाचें जंतू जर मला मिळाले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते अशी मुक्तफळे गायकवाड यांनी उधळली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT