Vinayk Mete Criticizes Cm Uddhav Thakrey
Vinayk Mete Criticizes Cm Uddhav Thakrey 
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे उद्धव ठाकरे करताहेत प्रकल्प रद्द : विनायक मेटे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने जुन्या विकास कामांना रद्द करणे चुकीचे असल्याचे प्रतिपादन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी येथे केले. लोकांच्या खेड्यापाड्यांच्या विकासाला कात्री लावणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या च्या दबावामुळे प्रकल्प थांबविणे सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या सरकारने मेट्रो कारशेडसारखे प्रकल्प रद्द केले आहेत. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपणही सरकार मध्ये होतो हे लक्षात घ्यावे, असा टोला मेटे यांनी लगावला. शिवस्मारकाचे काम मार्गी लावण्यास सरकारने पाऊले उचलावीत, असे सांगून ते म्हणाले, "शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्या औलादि महाराष्ट्रात जन्मल्या. त्यांनी शिवस्मारकाला विरोध केला. सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकर भूमिका मांडावी.''

ते पुढे म्हणाले, "काँग्रेस राष्ट्रवादी कडून मला जास्त काही अपेक्षित नाही.  पण उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा.शिवस्मारकाचा आढावा घेत स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर घेऊन स्मारकाच्या कामात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केला होता. आता काँग्रेस - राष्ट्रवादी ने स्मारकाच्या कामाची चौकशी करत स्मारकाचे काम मार्गी लावावे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT