Girish Mahajan- BJP
Girish Mahajan- BJP 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेने आमचा घात केला, पण काळ आगामी वेळ ठरवेल - गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो

जळगाव : शिवसेनेने आमचा घात करून ते सत्तेत जावून बसले आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या आहेत आम्ही विरोधी पक्षाचे काम करीत आहोत, परंतु सत्ताधारी पक्षच घाबरलेल्या अवस्थेत असून भाजप सरकार पाडणार असल्याची आवई अधूनमधून तेच उठवित असतात. आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही, तिघांचे पायात पाय अडकून तेच पडणार आहेत. असा सणसणीत टोलाभाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना राज्यात सरकार पाडण्याचा कोणताही फार्मुला चालणर नाही असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देतांना गिरीश महाजन म्हणाले, ''आम्ही राज्यातील सरकार पाडणार असे कधीही म्हणालो नाही. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी सोबत विधानसभा निवडणूक लढविली जनतेने युतीला सत्तेचा कौल दिला होता. मात्र जनतेचा विश्‍वासघात करून आणि मित्र पक्ष भाजपचा घात करून शिवसेनेने सत्ता स्थापन केली. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि ती भूमिका आम्ही स्विकारली आहे. जनतेसाठी आम्ही आवाज उठवित आहोत,''

''राज्यात आज सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकरी, एस.टी.कामगार, शेतमजूर, तसेच सर्वसामान्य जनता नाराज आहे. आज राज्यात सरकार कसे चालले आहे. हे सर्वाना दिसून आले आहे. त्यामुळे आम्ही कोणताही सरकार पाडण्याचा कोणताही फार्मुला वापरण्याची गरज नाही, आणि आम्ही तसा विचारही करीत नाही. राज्यात तीन पक्षाचे हे सरकारआपल्याच पायात पाय अडकून पडणार आहे. याची जाणीव सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षांना आहे. त्यामुळे तेच सरकार पडणार नाही, पाच वर्षे चालणार, असे वारंवार सांगत असतात.सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षाच्या नेत्यामध्ये तसेच मंत्र्यामध्ये सरकार पडण्याची कायम भिती दिसून येत आहे,'' असेही महाजन म्हणाले. 

काळ,वेळ निश्‍चित येईल
राज्यातील सरकारमधील नेते व मंत्री अस्वस्थ आहेत.असे मत व्यक्त करून महाजन म्हणाल, की त्यामुळेच भाजपवर टिका करीत असतात. परंतु ते आमच्या बाबत काहीही म्हणत असले तरीत्यांनी बोलण्याची घाई करू नये, ते काहीही म्हणत असले तरी या सरकारचा काळ आणि वेळ निश्‍चित येईल.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT