BJP Stone pelting
BJP Stone pelting 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजप कार्यालयावर दगडफेक; शिवसेना नगरसेवकांना जामीन

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक (Stone pelting on BJP office) प्रकरणातील शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर, (Deepak Datir) बाळा दराडे (Bala Darade) यांसह पाच जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. (Court sanction bail) दोन दिवसांपूर्वीच ते स्वतःहून पोलिसांत हजर झाले होते. (They surrender themself two day before) त्यानंतर त्यांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. यासंदर्भात नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्याची तीव्र निषेध झाला. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर  सकाळी शहर भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयावर दगडफेक झाल्याने शहरात तणाव होता.

दगडफेक करणारे कार्यकर्ते पोलिसांना सापडले नव्हते. ते पसार झाले. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले होते. या कार्यकर्त्यांनी मुंबईत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी खासदार राऊत यांनी त्यांची पाठ थोपटली होती. पुढे दोन दिवसांपूर्वी श्री. राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आले असता, हे कार्यकर्ते स्वतःहून पोलिसांत हजर झाले. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.  

भाजपच्या कार्यालयावर दगडफेकीच्या सीसीटीव्ही फुटेज तापसणी केल्यावर पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर, बाळा दराडे यांसह पाच जणांना आज न्यायालयात  पुन्हा हजर केले असता, त्यांची पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. 
...  
हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT