Vasant Gite
Vasant Gite 
मुख्य बातम्या मोबाईल

महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर भरती करा

सरकारनामा ब्युरो

नाशिक : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबतचा गुंता सुटण्याच्या मार्गावर असून, या संदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी लवकरच आदेश काढणार असल्याचे आश्‍वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

माजी आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वात आयुक्त जाधव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. महापालिकेतील मृत कामगारांच्या सुमारे दोनशेहून अधिक वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा प्रश्न गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने सरसकट सर्व वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, असा आदेश काढला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार ही भरती त्वरित व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. या मुद्द्यावर आयुक्तांशी चर्चाही झाली. अनुकंपा भरतीसंदर्भात आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर वारसांच्या निश्चितीचे काम पूर्ण झाले असून, एक-दोन दिवसांत या भरतीबाबतचे आदेश पारित होतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती श्री. गिते यांनी दिली.

महापालिकेत कर्मचारी भरतीबाबत सातत्याने पाठपुरावा होत असून गेली तीन वर्षे त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. मधल्या काळात महापालिकेने नव्या धोरणानुसार खाजगी संस्थांना कंत्राटी पध्दतीने विविध कामे सोपविली आहेत. त्यामुळे सार्वजनिक आररोग्य विभागासह विविध कामे सध्या खाजगी संस्था आणि कंत्राटी कामगारांतर्फे केली जात आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांची भरती लवकर व्हावी यासाठी दबाव वाढत आहे. 

यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, महानगर संघटक योगेश बेलदार आदी उपस्थित होते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT