Narayan rane-thackeray
Narayan rane-thackeray 
मुख्य बातम्या मोबाईल

नारायण राणेंना एकट्या शिवसेनेने कोंडीत पकडले... काॅंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते कुंपणावर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेचा निर्णय आणि त्यासंबंधीची कार्यवाही हा शिवसेनेने (Shivsena) एकहाती राबवलेला अजेंडा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राणे यांना मी फारसे महत्व देत नाही ,ते त्यांच्या संस्कारांप्रमाणे बोलतात असे सांगत याविषयी बोलणे नाकारले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले (Nana Patole) यांनी नारायण राणे यांच्या भाषेचा निषेध केला. मात्र ही दोन्ही विधाने सोडून महाविकास आघाडीतल्या दोन्ही पक्षांनी या वादापासून दूर रहाणे पसंत केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत वरिष्ठ पातळीवरून पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाशी संपर्क साधून अटकेच्या कारवाईची माहिती घेतली जात होती.यासंबंधातील सर्व हालचाली पोलिस महासंचालक कार्यालयातून होत होत्या.सायंकाळी उशीरा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले पण ही बैठक कोविडसंबंधात होती. राणे अटक ,राज्यात ठिकठिकाणी झालेली निदर्शने यावर कोणतीही चर्चा यावेळी होवू शकली नाही.

अटकेची रात्रीपासून तयारी

दरम्यान नारायण राणे यांच्या विधानाचा रोख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे.ही बदनामी सहन करायची नाही असा निर्णय काल रात्रीच झाला होता.राज्यातील सर्वोच्च पदाचा असा अपमान योग्य नाही हे लक्षात आणून दिले नाही तर शिवसेनेची जरब लक्षात येणार नाही .सत्तेत असतानाही आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंबद्दल ही मते ऐकून घेणे योग्य ठरेल काय असा प्रश्न विचारला गेला.

नाशिक व पुण्याची पथके कुठे ?

दरम्यान नाशीक पोलिसांनी पाठवलेले पथक रात्री उशीरापर्यंत कोकणात पोहोचू शकले नव्हते तसेच पुण्यातूनही पथक पोहोचले नाही.कोकण पोलिस आयुक्त संजय मोहिते यांनी अटकेची कारवाई अखेर पूर्ण केल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT