Navi Mumbai Congress Chief May be Shunted out
Navi Mumbai Congress Chief May be Shunted out 
मुख्य बातम्या मोबाईल

नवी मुंबईतील शिवसेनेचा नेता काँग्रेसच्या वाटेवर?

सरकारनामा ब्युरो

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चेबांधणी करताना दिसून येते आहे. आता शिवसेनेचा एक नेता काँग्रेसच्या वाटेवर असून तो काँग्रेसमध्ये आपली घरवापसी करणार आहे.

आगामी काळामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेच्या एका नेत्याला काँग्रेसमध्ये घेऊन  जिल्हाध्यक्ष करण्याचा घाट काँग्रेसने घातला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे

नवी मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडे नेतृत्व नसल्यामुळे त्या शिवसेनेचे नेत्याला काँग्रेसमध्ये घेऊन नवी मुंबई मध्ये काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसून येत आहेत.महाविकासआघाडी मध्ये काँग्रेसचा अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी हा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या बद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे पक्षांमध्ये अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे शिवसेनेत गेलेल्या एका नेत्याची घरवापसी करून त्याच्याकडे नवीन जबाबदारी देणार असल्यामुळे आगामी काळामध्ये काँग्रेस नवी मुंबई मध्ये निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी  करताना  दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT