UDDHAV THAKRE HELPS NARENDRA MODI GOVERNMENT
UDDHAV THAKRE HELPS NARENDRA MODI GOVERNMENT 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेचा डबल गेम : राज्यसभेत गैरहजर राहून  मोदी सरकारला टेकू

सरकारनामा

नवी दिल्ली :  नागरिकत्व घटनादुरूस्ती वर लोकसभेत काॅंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा  वेगळी भूमिका घेऊन विधेयकाला पाठिंबा देणाऱया शिवसेनेने राज्यसभेतील मजुरीवेळी अनुपस्थित राहून  बहिर्गमनाचा मार्ग चोखाळला व एका अर्थाने पुन्हा सरकारला पूरक भूमिका घेतली.


लोकसभेतील मंजुरीनंतर शिवसेनेने तळ््यात मळ्यात सुरू केले होते. या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आजच्या भाषणातही पाठिंबा देणार की काॅंग्रेसप्रमाणे विरोध करणार हे स्पष्ट केले नव्हते. अखेरीस मतदानाच्या वेळी शिवसेनेचे तीनही सदस्य गैरहजर राहिले. यामुळे सरकारच्या बहुमताचा आकडा १२६ वरून आणखी वाढला . विरोधातील तीन मते कमी झाली .  सरकारसाठी शिवसेनेची भूमिका पुन्हा सहाय्यभूतच ठरली.


दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात शिवसेनेला टोला लगावताना, सत्तेसाठी  लोक कसे कसे रंग बदलतात , असा हल्ला चढविला होता. राऊत यांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण शहा यांनी त्यावरही प्रतिहल्ला करताना, महाराष्ट्राची जनताच हे  जाणू इच्छित आहे की एका रात्रीत असे काय घडले  की शिवसेनेने आपली भूमिका बदललीय़ असा तिखट सवाल केला. त्यावर राऊत खाली  बसले. त्यानंतर काही  वेळातच ते व अनिल देसाई सभागृहाच्या बाहेर निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT