Shivsena
Shivsena  
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोनातही शिवसेनेची महापालिका निवडणुकीची तयारी

सरकारनामा ब्युरो

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी शहरात पाच सदस्यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या सूचनानुसारच पुढील नियोजन होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निवडणुका वेळेत होतात की नाही, याबाबत शंका असली तरी राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरवात झाली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून शिवसेनेने महापालिका क्षेत्रासाठी पाच सदस्यांची समिती गठित केली आहे.

समितीमध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित समिती खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सूचनेनुसार काम करेल, नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे नियोजन करण्यासोबतच संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक निर्णय, विविध आंदोलने, जनजागृती आणि महाविकास आघाडी सरकारने घेतलेले विविध लोकाभिमुख निर्णय लोकांपर्यत पोचवणे, तसेच संघटनेतील कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ही समिती कामकाज करेल, अशी माहिती संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.

राज्यात सध्या लॅाकडाउन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग असल्याने सार्वत्रिक निवडणुकांबाबत अनिश्चितता आहे. पंढरपूरसर पाच राज्यांत निनडणुका घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. राज्य शासनाने देखील त्यांच्या अखत्यारीतील सहकारी संस्था व अन्य निवडणुका यापूर्वीच लाबंणीवर टाकल्या आहेत. मात्र महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असल्याने त्यांनी मात्र त्याबाबत तयारी सुरु केली आहे. 

...

हेही वाचा...


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT