Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar 
मुख्य बातम्या मोबाईल

केंद्र सरकार विरोधातील मोर्चातून शिवसेनेचे निवडणुकीचे रणशिंग

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने तयारी सुरू केली (Shivsena starts prepration for Upcoming NMC election) असून, त्याचाच एक भाग म्हणून कोअर कमिटीच्या बैठकीत शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामांचे निर्णय घेताना महागाईच्या प्रश्‍नावर (Devolopment and inflation issue)  केंद्र सरकार विरोधात शहरातून भव्य मोर्चा (They will organise agitation against Delhi Government) काढण्याचा निर्णय घेतला.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सामूहिक निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने पाच सदस्यांची कोअर कमिटी गठीत केली आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांचा कमिटीत समावेश आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सत्ता मिळविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचा एक भाग म्हणून गठीत केलेल्या कोअर कमिटीची पहिली बैठक झाली. बैठकीत संघटना बळकट करण्याच्या विषयावर चर्चा झाली. संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी भाजपकडून आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने त्या विरोधात मतदारांसमोर हिशेब मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांचे मार्केटिंग, खासदार व आमदार निधीतून करावयाची कामे आदींचा आढावा घेण्यात आला. शहरासंदर्भातील प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनदरबारी धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्राविरोधात आंदोलन
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून कोअर कमिटीची पहिली बैठक झाली. यात शहराशी संबंधित प्रश्‍न शासनदरबारी सोडविण्यासाठी धाव घेतली जाणार आहे. महागाईविरोधात शहरात भव्य मोर्चा काढला जाणार आहे. इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्यातून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या मुद्यावर भाजप विरोधात रान पेटविण्यासाठी शहरात मोठे आंदोलन उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दिली.

शिवसेनेच्या मागण्या
नाशिक शहरातील विकासाचे अनेक प्रश्न लोंबकळत पडले आहेत. त्यामुळे शविसेनेने विविध मागण्या केल्या. यामध्ये, मुंबईच्या धर्तीवर झोपडपट्टीमुक्तीसाठी एसआरए योजना राबवावी, वाहनतळांच्या जागेवर मल्टिस्टोअर पार्किंग करावी,  शहरातील पार्किंग समस्या सोडवावी, तपोवनातील सिंहस्थाच्या जागेवर प्रदर्शन स्थळ करावे, शासनामार्फत गोदावरी रिव्हर फ्रंट योजना राबवावी, पूररेषेतील बांधकामांना दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर भव्य रुग्णालय उभारावे, काळाराम मंदिर व परिसर सुशोभीकरण करावे या मागण्यांचा समावेष आहे.
...  
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT