Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar 
मुख्य बातम्या मोबाईल

महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ द्यावी

सरकारनामा ब्युरो

सिडको : शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी नागरिकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे मदत करावी. आगामी महापालिका निवडणुकीत सिडकोतून शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी माझ्या शिरावर येऊन पडली असून, त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ हवी, असे आवाहन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.

शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडकोच्या पदाधिकाऱ्यांशी मुक्त संवाद साधताना ते बोलत होते. सिडको परिसराचा आज जो सर्वांगीण विकास झाला आहे त्यात शिवसेनेच्या नगरसेवकांचे योगदान मोलाचे आहे.

प्रामुख्याने स्थायी समितीचे माजी सभापती मामा ठाकरे, अमोल जाधव, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल. नाशिकच्या विकासातसुद्धा सिडकोतील शिवसेनेच्या नगरसेवकांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. आगामी मनपा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आपण सर्वांनी कठोर परिश्रम घ्यावेत. सिडकोच्या विकासासाठी दोन उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव सादर केलेला असतानाही प्रशासनाला हाताशी धरून या प्रश्नात ‘खो’ घालण्याचा कोतेपणा सत्तारूढ भाजपा करीत आहे. त्यांचा हा डाव शिवसेना निश्चितच उधळून लावेल, असा टोलाही बडगुजर यांनी भाजपला लगावला. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रभागनिहाय दौरा व संघटनात्मक बांधनीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संपर्क मोहीम सुरु केली होती. मात्र सध्या त्यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिका-यांनी नागरिकांना कोरोनासंदर्भात मदत करावी. ज्यांना ज्यांना गरज असेल त्या प्रत्येकाच्या मदतीला धाऊन जा. प्रशासन व वैद्यकीय सुविधांबाबत तक्रारी असल्यास आक्रमकपणे त्याचे निराकरण करुन 80 टक्के समाजकारणावर भऱ द्यावा अशा सूचना केल्या. .  
या वेळी विधानसभाप्रमुख प्रवीण तिदमे, उपमहानगरप्रमुख विष्णू पवार, विभागप्रमुख पवन मटाले, प्रदीप पताडे, प्रताप मटाले, सुरेश पाटील, विभाग संघटक प्रकाश दोंदे, योगेश पाटील, विभाग समन्वयक बबलू सूर्यवंशी, राजू कदम, उपविभागप्रमुख किरण शिंदे, अजित काकडे, दीपक भोंगे, शैलेश कार्ले, अभिजित सूर्यवंशी, मॉन्टी दळवी, राहुल सोनवणे, अशोक पारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.उपचार घेणा-या गरजूंनाच रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रांगा कायम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT