Mantralaya
Mantralaya 
मुख्य बातम्या मोबाईल

Breaking - मंत्रालयात पुन्हा शाॅर्टसर्किट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मंत्रालयात काही वेळापूर्वी पुन्हा शॉर्टसर्किट झाले आहे. जुन्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाले. मात्र, वेळीच स्विच बंद केल्याने मोठा धोका टळला आहे. या शाॅर्टसर्किटमुळे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी लागलेल्या आगीची आठवण झाली. 

जुन्या इमारतत आज सकाळपासून वीज गेली होती. त्यामुळे अनेक विभागांचे काम बंद होते. काम सुरु करण्यासाठी नवीन इमारतीचे वीज कनेक्शन जुन्या इमारतीच्या पॅसेजमध्ये देण्यात आले होते. त्यामुळे पॅसेजमध्ये लाईट होते. परंतु, सर्व मंत्र्यांची दालने आणि अधिकाऱ्यांच्या दालनात वीज पुरवठा खंडीत झाला. यापूर्वी मंत्रालयात यावर्षी ३० मार्चला आग लागली होती. त्या आधी सर्वात मोठी आग २१ जून २०१२ रोजी लागली होती.  या आगीत 23,333 फाईल्स जळाल्या होत्या.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT