मुख्य बातम्या मोबाईल

साहेब, तुम्हीच मला आमदार करू शकता : दीपक पवार  

सरकारनामा ब्युरो

सातारा  : ज्या घरात तुम्ही 45 वर्षे सत्ता दिली, त्या घराण्याने जावली, साताऱ्याचे वाटोळे केले आहे. पण, साहेब मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्हीच मला आमदार करू शकता, बाकी कोणीही नाही. त्यासाठीच मी तुमच्या छत्रछायेखाली आलो आहे, असे उद्‌गार जावळीचे नेते दीपक पवार यांनी काढले.

दीपक पवार यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहिर मेळाव्यात खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीचा मफलर आणि शरद पवार यांच्या हस्ते बुके स्वीकारून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

 यावेळी त्यांनी खासदार शरद पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांचाही तलवार आणि शाल देऊन सत्कार केला.

दीपक पवार आपल्या समर्थकांसह बॉम्बे चौकातून राष्ट्रवादीची जाहिर सभा सुरू असलेल्या हॉटेल कल्याण रिसॉर्टमध्ये आले. त्यावेळी समर्थकांनी वाघ आला रे वाघ आला जावळीचा वाघ आला... अशा घोषणा दिल्या. यावेळी दोन्हीकडच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

यावेळी दीपक पवार म्हणाले, मी महामंडळ आणि जिल्हा परिषदेचा राजीनामा दिला आहे. माझ्यासोबत 388 बूथ प्रमुखांसह मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गेली सहा वर्षे मी भाजपमध्ये होतो. त्यांच्या सर्व संकल्पना मी सातारा तालुक्‍यात राबविल्या. प्रामाणिकपणे काम केले. पण, साहेब ज्या घरात तुम्ही 45 वर्षे सत्ता दिली, त्या घराण्याने जावली, साताऱ्याचे वाटोळे केले आहे. 

विधानसभेत शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात मी 54 हजार मते घेतली आहेत. यावेळेस निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी मला कामाला लागा असे आदेश दिले होते. गांधी मैदानावरील सभेत त्यांनी माझी भावी आमदार दीपक पवार असा उल्लेखही केला होता. आम्ही सवर्जण त्यांचे ऐकून कामाला लागलो. पण तुमच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मी एकमेव असा नेता आहे की ज्याने शिवेंद्रसिंहराजे हटाव... भाजप बचाव... ची भुमिका घेतली होती. 

अशी भुमिका घेऊनही मी पक्षाचे ऐकून शिवेंद्रसिंहराजेंचे काम केले असते तर मला जनतेने मला बुटाने मारले असते. त्यामुळे मी राष्ट्रवादीत आलो आहे. आता भाजपने केमीकल टाकून त्यांना स्वच्छ केले आहे. पण, साहेब मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्हीच मला आमदार करू शकताय, बाकी कोणीही नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT