233Sarkarnama_20Banner_20_202021_05_03T170654.906.jpg
233Sarkarnama_20Banner_20_202021_05_03T170654.906.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

आता SIT करणार परमबीर सिंग प्रकरणाचा तपास

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांच्या प्रकरणाचा तपास एसआयटी SIT करणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआटीची स्थापना करण्यात आली आहे. 

मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे. उपायुक्त दर्जाचा अधिकारी या एसआयटीचा प्रमुख असून सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी एसआयटीचा प्रमुख तपास अधिकारी असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुखांवर हे आरोप केले. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेमार्फत देशमुखांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याचे या पत्रात म्हटलं आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ईडीकडूनही मनी लाँर्डिंगच्या आरोपाखाली देशमुख यांची चौकशी सुरू आहे.

परबीर सिंग यांच्याविरोधात पहिले प्रकरण मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकारी व बड्या व्यक्तींच्या संदर्भातील असल्यामुळे तपासावर त्याचा परिणाम होऊ नये, तसेच विशिष्ठ वेळेत याप्रकरणांचा तपास होण्यासाठी या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटी थेट सहपोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील व पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना थेट रिपोर्ट करणार असल्याची माहिती सूञांनी दिली. त्यामुळे सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला  परमबीर सिंह यांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. पोलिस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बुकी सोनू जालानच्या तक्रारीप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी) तपास करत आहेत. गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह  उपायुक्त अकबर पठाण,  श्रीकांत शिंदे, पोलिस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT