मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित?

भारत नागणे / संपत मोरे

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या करमाळा तालुक्याच्या नेत्या रश्मी बागल - कोलते या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने त्या पक्ष सोडणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

या संदर्भात त्यांनी सोमवारी करमाळ्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावल्याची माहिती दिग्विजय बागल यांनी दिली. बागल यांनी शिवसेना प्रवेश केल्यास सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का ठरेल. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत त्यांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. करमाळा तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल जलसंधारण मंत्री व शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या मार्फत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रवेशासाठी भेटल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्याला आता पुष्टी मिळत आहे.  सौ.रश्मी बागल-कोलते या सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिका आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या करमाळा तालुक्याच्या नेत्या रश्मी बागल यांच्या गटाने सोमवारी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे. दरम्यान बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी 'आमचं ठरलं आहे जय महाराष्ट्र'असे स्टेटस फेसबुकवर ठेवल्याने बागल या शिवसेनेचा रस्ता धरतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय.

बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा आग्रह कार्यकर्ते करताना दिसत आहेत.बागल यांचे निकटवर्तीय अविनाश देशमुख यांनीही फेसबुकवर 'जय महाराष्ट्र'अशी पोस्ट केली आहे.त्यामुळेही बागल यांच्या शिवसेना प्रवेश होणार असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT