Raote_ST
Raote_ST 
मुख्य बातम्या मोबाईल

एसटीत दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांमधील तरुणांसाठी ४२४२ पदांची महाभरती: रावते 

सरकारनामा

 मुंबई : "औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या १५ दुष्काळग्रस्त घोषित जिल्ह्यांमध्ये होणार चालक आणि वाहकांच्या ४२४२ पदांची भरती होणार आहे ," अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे . 

श्री . रावते यांनी सांगितले ,"या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना परीक्षा शुल्कात  ५० टक्क्यांची सवलत दिली जाईल . लवकरच  जाहिरात प्रसिद्ध केली जाईल .  इतर आरक्षणाबरोबरच मराठा आरक्षणाचीही या भरतीत अंमलबजावणी होणार आहे ."

श्री . रावते यांनी सांगितले की ," भरतीतील उत्तीर्ण पात्र उमेदवारांना औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे . "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT