LEFT
LEFT 
मुख्य बातम्या मोबाईल

नेहरूनगरला रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा

सरकारनामा ब्युरो

नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग विचारात घेऊन तातडीने रुग्णांसाठी पुरेशी वैद्यकीय व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे नेहरू नगर येथील रुग्णालय सध्या पुरेशा क्षमतेने कार्यरत नाही. त्यामुळे तेथे तातडीने कोविड उपचार केंद्र सुरु करावे अशी मागणी डाव्या आघाडीचे माजी नगरसेवक तानाजी जायभावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. 

यासंदर्भात त्यांनी नुकतीच जिल्ह्यातील हेमंत गोडसे आणि डॅा भारती पवार या दोन्ही खासदारांची भेट घेतली. यासंद्रभात निवेदन देऊन परिस्थिती अवगत केली. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी सर्वसामान्य  जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या नेहरू नगरचे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल करण्याबाबत निर्णय घ्यावा. यासाठी डावी लोकशाही आघाडी नाशिक जिल्हा शाखेतर्फे दोन्ही खासदार तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. 

या प्रश्नावर खासदार गोडसे आणि डॅा पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा  करण्याचे आश्वासन दिले. महापौरांनी या मागणीला पाठींबा दर्शविला. शहरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नाशिकरोड परिसरात त्याची मोठी संख्या आहे.  बिटको रुग्णालयावर  ताण येत आहे.  शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्यासाठी लवकर पावले टाकण्याची गरज आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी, कामगार आणि विविध आस्थापनांत काम करणाऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. शहरातील आरोग्य सुविधांवर मोठा ताण येत आहे. शहरातील रुग्णालयांवर विभागातील पाच जिल्यातील कोरोना रुग्णाचा ताण पडत आहे. नेहरू नगर येथील हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल केल्यास प्रशासनावरील ताण हलका होईल. रुग्णांची सोय होईल. 

यावेळी डाव्या आघाडीचे राजू देसले, माजी नगरसेवक अॅड मनीष बस्ते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (प्रा. कवाडे गट) नेते गणेश उन्हवणे, माजी उपमहापौर गुलाम  भाई शेख यांसह विविध पदाधिकारी होते. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT