sangeeta Gaikwad
sangeeta Gaikwad 
मुख्य बातम्या मोबाईल

तिसऱ्या लाटेची प्रतिक्षा नको, लगेच लसीकरणाची तयारी करा!

संपत देवगिरे

नाशिक : या शहराने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खुप सोसले आहे. (people suffer much in second covid wave)  नागिरकांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेची वाट (Do not wait foe third covid19 wave, Prepare for vaccination) नका पाहू. लगेचच शहराच्या सर्व विभागात लसीकरणाचे केंद्र निश्चित करून तयारी करा, अशी मागणी महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती संगिता गायकवाड (Education committee Chairmen Sangita Gaikwad) यांनी केली आहे.

लसीकरणाबाबतच्या नियोजनासाठी आज महापौर निवासस्थानी पक्षनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी शहरातील कोरोनाचा आढावा घेण्यात आला. यापुढे लसीकरणाविषयी चर्चा झाली.

त्यानंतर हे सर्व पदाधिकारी आयुक्त कैलास जाधव यांना भेटले. यावेळी सभापती सौ. गायकवाड यांनी शहरात नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी गोंधळ आहे. त्यांच्या आत्मविश्वास वाढविण्याचे काम प्रशासन व लोकप्रतिनिधींना करावे लागेल. ज्या बातम्या कानावर येतात, त्यातून पुढचे चित्र अनिश्चित आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार ही शक्यता भारत सरकारसह विविध जागतिक संस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्या लाटेत आपल्याला कोरोनाचा पराभव करावा लागेल. त्यासाठी तिसरी लाट केव्हा येणार याची वाट न पाहता तातडीने शहराच्या सर्व भागात लसीकरणाचे केंद्र व त्याची व्यवस्था यासाठी काम सुरु केले पाहिजे. यंत्रण तप्तर व तयार ठेवावी लागेल.    

यावेळी सौ. गायकवाड यांनी नाशिक रोड विभागातील लोकसंख्या लक्षात घेऊन येथील राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय तरण तलावाच्या आवारात करोना लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी सूचना केली. त्याबाबत त्यांनी यापूर्वीच आयुक्तांना पत्र दिले आहे. 

पत्रात म्हटले आहे की, नाशिक रोड येथे बिटको रुग्णालय आणि खोले मळा येथे लसीकरण केंद्र आहेत. मात्र, आगामी काळात लसीकरणाला होणारी गर्दी लक्षात घेऊन तरण तलावाच्या आवारात केंद्र सुरू करण्याची गरज आहे. हे मध्यवर्ती ठिकाण असून मोठी सभागृह आहेत. या ठिकाणी पार्किंगसाठी सुविधा आहे. आनंद नगर, जगताप मळा, धोंगडे नगर, पंजाब कॉलनी, गायखे कॉलनी, फर्नांडिस वाडी, लोणकर मळा, शिखरेवाडी, गंधर्व नगरी, पंजाब कॉलनी, सहाणे मळा आदी भागातील लोकांना या केंद्राचा लाभ होऊ शकतो. मंडप, फर्निचर, लॅपटॉप व इतर साहित्य लागल्यास आपण आपल्या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपलब्ध करू. अन्य मदत देखील करू. येथे केंद्र सुरु करुन नागरिकांना दिलासा द्यावा.
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT