Students will get concessions for medical examinations amid Corona
Students will get concessions for medical examinations amid Corona 
मुख्य बातम्या मोबाईल

चिंता नको! कोरोनामुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोरोना (Covid-19) संसर्गामुळं राज्यातील बारावीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बहुतेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (Medical Education) परीक्षा ता. 10 जूनपासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. (Students will get concessions for medical examinations amid Corona)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली  नाशिक येथे झालेल्या परिक्षा मंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 

विद्यापीठाच्या 10 जूनपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षेस कोरोना पॅाझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांची लेखी प प्रात्यक्षित परीक्षा झाल्यानंतर स्वतंत्रपणे विशेष परीक्षा घेतली जाईल. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रयत्नांचे (Attempt) बंधन राहणार नाही. या परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. 

परीक्षेला येण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा शासनमान्य कोविड रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेता येईल. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची तिथे व्यवस्था केली जाईल. 

वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात  यावी, वसतिगृहाच्या मेस मध्ये त्यांच्या भोजनाची सोय करण्यात  यावी, अशी सुचना देण्यात आल्या आहेत.  वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात येणार आहे. सर्व प्रकारची काळजी घेऊनच घेण्यात घेण्याच्या सुचना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आल्या आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT