Supreme court denies one more chance to aspirants who exhausted UPSC last attempt
Supreme court denies one more chance to aspirants who exhausted UPSC last attempt 
मुख्य बातम्या मोबाईल

यूपीएससी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मागील वर्षी यूपीएससी परीक्षेसाठीची वयोमर्यादा तसेच परीक्षा देण्याची संधी संपलेल्या परीक्षार्थींबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यूपीएससी परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या परीक्षार्थींना दिलासा मिळू शकलेला नाही. 

मागील वर्षी कोरोनामुळे अभुतपूर्व स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मागील वर्षी परीक्षेची तयारी करण्यात अनेक अडचणी आल्या. काहींना अॉक्टोबर महिन्यात झालेली परीक्षा देता आली नाही. परिणामी, मागील वर्षी वयोमर्यादा ओलांडलेल्या व परीक्षा देण्याची संधी पूर्ण केलेल्यांना अतिरिक्त संधी देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. पण याचिका न्यायालयाने फेटाळल्याने अॉक्टोबर महिन्यात अंतिम संधी पार केलेल्या परीक्षार्थींना दिलासा मिळू शकला नाही. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संबंधित परीक्षार्थींना अतिरिक्त संधी देण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. पण केंद्र सरकारने केवळ वयोमर्यादेच्या आत असलेल्या परीक्षार्थींनाच अतिरिक्त संधी देण्याबाबत सहमती दर्शविली होती. वयोमर्यादा ओलांडलेल्या परीक्षार्थींना संधी देण्यास केंद्र सरकार तयार नव्हते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 

केंद सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस वी. राजू यांनी बाजू मांडताना म्हटले होते की, सरकार या मुद्यावर कठोर नाही. यावर विचार करण्यात आला आहे. पण ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांना संधी देणे अशक्य आहे. हा धोरणात्मक मुद्दा आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये निकाल देताना केवळ एकाच शब्दात ही याचिका फेटाळत असल्याचे सांगितले. न्यायालयाने पूर्ण निकाल वाचून दाखविला नाही. त्यामुळे निकालामध्ये नेमके काय आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. न्यायालयाचा पूर्ण निकाल आल्यानंतर काही बाबी स्पष्ट होऊ शकतील. तसेच यूपीएससीकडून पुढील परीक्षेबाबत काढण्यात येणाऱ्या नोटीफिकेशन बाबतही परीक्षार्थींना उत्सुकता आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT