Supriya Sule9.jpg
Supriya Sule9.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश...

सरकारनामा ब्युरो

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, पुरंदर आणि भोर तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामे लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागणीनुसार या रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने एकूण १५ कोटी ५५ लाख दहा हजार रुपये मंजूर केले आहेत. 

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडॆ सुळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधी मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये भोर तालुक्यातील भोर पासून उत्रौली कान्हेवाडी खंडाळा फाटा ते सातारा जिल्हा हद्दीपर्यंत दोन कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.     

वेल्हे तालुक्यातील  कादवे – वडघर – शिरकोली – माणगाव – टेक पवळे रस्त्यासाठी दीड कोटी

मुळशी तालुक्यातील दासवे  - लव्हार्डे - मुठा - पानशेत रस्त्यावर मुठा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी अडीच कोटी रुपये, पुरंदर तालुक्यातील  सटलवाडी – पिंगोरी – कवडेवाडी – भोरवाडी खिंड – कोळविहीरे – मावडी क.प. - पांडेश्वर – नायगाव – माळशिरस रस्ता दुरुस्तीसाठी तीन कोटी, 

दौंड तालुक्यातील पारगाव – खुटबाव – यवत – सासवड या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यासाठी तीन कोटी, तर गोपाळवाडी - लिंगाळी खोरोडी ते राज्य मार्ग ६८ (दौंड बाह्यवळण रस्ता) या रस्त्याची दुरुस्ती करणे यासाठी दोन कोटी, राजेगाव खानोटा पर्यंतचा (राजेगाव ते राशिन फाटा) रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ३१ लाख रुपये, नानवीज वायरलेस फाटा गिरिम ते कुरकुंभ रस्ता दुरुस्तीसाठी २० लाख आणि गार कडेठाण दापोडी रस्त्याला जोडणारा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT