Supriya Sule
Supriya Sule 
मुख्य बातम्या मोबाईल

सुप्रिया सुळे यांना हवे आहेत 'या' कारणासाठी सुस्थितीतील जुने स्मार्ट मोबाइल

सरकारनामा ब्युरो

पुणे : आपल्याकडील सुस्थितीतील जुने स्मार्ट मोबाइल, लॅपटॅाप, संगणक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहान खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नागरिकांना केले आहे. पुणे जिल्हा परिषदेने सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. स्थानिक नागरिकांना याबाबत आवाहन करण्यात आले आहे. 


''कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे सध्या शक्य नाही. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे हा चांगला पर्याय आहे. विद्यार्थ्यांना 
ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सर्व अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक व्हिडिओ प्रत्येक शाळेतील शिक्षकाकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडे अॅनड्राईड मोबाइल असणे गरजेचे आहे.  

ग्रामीण भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाही. ते गरीब आहेत. ऑनलाईन शिक्षणापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडील जुने सुस्थितीतील स्मार्ट मोबाइल, लॅपटॅाप, संगणक शाळांना दान करावे, ते अशा गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येईल,'' असे पत्र गटशिक्षण अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने पाठविले आहे. 


सुप्रिया सुळे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत.परंतु ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.परंतु  ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना अँड्राईड फोन, स्मार्ट टिव्ही, टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर अशा साधनांच्या अभावी शिक्षण घेणे अवघड झाले आहे. हे लक्षात घेऊन पुणे जिल्हा परिषदेने समाजातील दानशूर व्यक्तींना आपले सुस्थितीतील जुने मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर, स्मार्ट टिव्ही अशा वस्तू या विद्यार्थ्यांना दान करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय शक्य असल्यास या सर्व वस्तू नव्याही घेऊन देता येतील.''
  
माझी विनंती आहे की, या मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी मदतीचा हात आवश्यक आहे.तरी कृपया आपल्याकडील सुस्थितीत असणाऱ्या मोबाईल, लॅपटॉप आदी वस्तू पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जमा कराव्या. अधिक माहितीसाठी आपण 1800 233 4130 या क्रमांकावर संपर्क साधू शकता, असे टि्वट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT