Sarkarnama - 2021-09-16T093808.214.jpg
Sarkarnama - 2021-09-16T093808.214.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

''घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय,'' सुरेखा पुणेकर संतप्त

सरकारनामा ब्युरो

पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशावरुन भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी तीन दिवसांपुर्वी एका जाहीर सभेत सुरेखा पुणेकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे', असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्याला सुरेखा पुणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  प्रविण दरेकरांना सुरेखा पुणेकरांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं आहे. ''घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय,'' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ''मला दरेकरांबाबत खूप वाईट वाटतं आहे की एवढे मोठे नेते आहेत तरीही त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला ? आज मी धुण्याभांड्याची कामं करून इथपर्यंत आले आहे. मी जर महाराष्ट्राची कला परदेशात नेऊ शकले, घराघरात मी लावणी कला चुकवली. अशा महिलेला दरेकरसाहेब नावं ठेवत असतील तर ते साफ चुकीचं आहे. महिलांना मान देऊ शकत नाही तर ठीक आहे पण अपमान तरी करू नका. प्रविण दरेकर यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्य़था याचा परीणाम वाईट होईल.''

रूपाली चाकणकर जे बोलल्या ते योग्यच आहे. कलाकारांचा चाहता राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आता माझा पक्षात प्रवेश होणार आहे. मी अजून काही जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यांच्याकडे मी काही मागितलेलं नाही. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन
 -सुरेखा पुणेकर  
 

''त्यांच्या घरात महिला नाही. गालावरची लाली आता कळली का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश करत असताना कळली का? प्रविण दरेकर यांना हे आत्ताच बोलावंसं का वाटलं? महिलेचा अपमान करणं तुम्हाला शोभलं का? आज तुम्ही भाजपसारख्या मोठ्या पक्षात आहात, पक्ष एवढा मोठा आहे, एवढा चांगला तरीही घाण तोंडाचे तुम्ही त्या पक्षात कसे काय, असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या.  सुरेखा पुणेकर यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत  दरेकरांना उत्तर दिलं आहे.  

काय बोलले होते प्रवीण दरेकर? 
पुण्यात आयोजित रामोशी समाजाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. "राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.  अशी घणाघाती टिका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली.  
Edited by : Mangesh Mahale  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT