sushila morale comment on vanjari caste politics
sushila morale comment on vanjari caste politics 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपने कितीही 'कराड' पुढे आणले तरी ते पंकजा मुंडे यांना पर्याय होवू शकत नाहीत!

संपत मोरे

पुणे : "भाजपने पंकजा मुंडे यांना कितीही पर्याय उभे केले तरी वंजारी समाज नेहमीच पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहील. पंकजा मुंडे यांनाच समाजमान्यता आहे. त्यामुळे त्यांना पर्याय उभा करण्याची भाजपची खेळी कधीही यशस्वी होणार नाही," असे मत लोकतांत्रिक जनता दलाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. सुशीला मोराळे यांनी व्यक्त केले आहे.

"पंकजा मुंडे यांनी एका पराभवाने खचून जायला नको होतं. त्यांनी लढाऊ बाणा ठेवायला हवा होता. त्यांनी आता गोपीनाथ मुंडे होण्याचा प्रयत्न करावा,"असा सल्ला मोराळे यांनी दिला आहे.

भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवार नाकारल्यानंतर पडसाद उमटत आहेत. यासंदर्भाने सुशीला मोराळे यांनी,"पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीत जरी पराभूत झाल्या असल्या तरी जनमत त्यांच्या बाजूने आहे. भाजपने भागवत कराड आणि रमेश कराड यांना जरी पुढे आणले असले तरी ते पंकजा मुंडे यांना पर्याय होऊ शकत नाहीत," असे सांगितले.

"गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई अजून संपलेली नाही आणि ती संपणार नाही. ती पुण्याई पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहे. पराभवाने पंकजा मुंडे खचून गेल्या आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडे व्हावे. राज्यात मुंडे यांना मानणारा गट आहे .त्या गटाचे नेतृत्व करावे."असे मोराळे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्याही चुका आहेत

"ज्यावेळी पंकजा मुंडे सत्तेत होत्या तेव्हा त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना साथ देणाऱ्या लोकांना ताकद द्यायला हवी होती. लोकांच्या संपर्कात रहायला हवे होते मात्र त्यांचा लोकसंपर्क कमी झाला. त्यांना चुकीचे सल्लागार भेटले. त्या सल्लागारांनी त्यांना चुकीचे सल्ले दिले. त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला,"असे मोराळे म्हणाल्या.

"पंकजा मुंडे यांची राजकीय कोंडी सुरू आहे पण घरात गप्प बसून ही कोंडी फुटणार नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवनंतर पंकजा मुंडे परळीला आलेल्या नाहीत. लोकांना भेटत नाहीत. असं राजकारणात चालत नाही. राजकारणात जय पराजय होत असतात. पराभवाने खचून गेले नाही असं म्हणणाऱ्या पंकजा पराभवाने खचल्या आहेत,"असे मोराळे म्हणाल्या.

त्या विधानामुळे त्रास झाला

"पंकजा मुंडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर 'मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. हे विधान केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुखावले. फडणवीस आणि मुंडे यांच्यातील संघर्ष बघायला मिळाला पण मुंडे यांच्या त्या वाक्याचा त्याना त्रास झाला,"असेही मोराळे म्हणाल्या.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT