sushil_kumar
sushil_kumar 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेला पाठिंबा देण्यास शिंदे आणि निरुपम यांचा विरोध

सरकारनामा

मुंबई:  काँग्रेसचे काही नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेत असतानाच ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या हालचालींना विरोध केला आहे. 

सुशील कुमार शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले,  काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये . आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे . आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही.  काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा घेऊ नये.  जनतेचा कौल मान्य करून विरोधी पक्षात बसायची  तयारी ठेवावी. 


मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले , शिवसेना आणि भाजप यांच्यातील हे भांडण म्हणजे  एक नाटक आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री पदासह मंत्रिपदांवरून ओढाताण सुरु आहे .  त्यांच्यामध्ये तडजोड झाली जागा ठरल्या म्हणजे हे भांडण मिटणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देऊ  नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे . 


दरम्यान महाराष्ट्रातील काही नेते आज दिल्लीला रवाना झालेले आहेत . भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा द्यावा की देऊ नये याबाबत सोनिया गांधी यांचे मत जाणून घेण्यासाठी  राज्यातील  काँग्रेस नेते इच्छुक आहेत . 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,विजय वडेट्टीवार ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,माणिकराव ठाकरे  असे नेते सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी  दिल्लीला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे . त्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम आणि सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा विशेष महत्त्व काँग्रेस वर्तुळात दिले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT