Suspension of a teacher who refuses Kovid's duty
Suspension of a teacher who refuses Kovid's duty  
मुख्य बातम्या मोबाईल

कोविडची ड्यूटी नाकारणे भोवले; सहायक शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई  

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी :  कोविडच्या ( Kovid) महत्वपूर्ण कामास नकार देऊन उलट वाद घालत धमकी देणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या सहायक शिक्षिकेला (Assistant teacher) आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil) यांनी आज (ता. १८ मे) तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच, या शिक्षिकेची विभागीय चौकशी करण्याचा आदेशही त्यांनी काढला आहे. दरम्यान, कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी कोणी पैसे मागितल्यास त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. (Suspension of a teacher who refuses Kovid's duty)

अस्मिता माधव गुरव असे निलंबित शिक्षिकेचे नाव आहे. आयुक्तांनी कोविडसाठी स्थापन केलेल्या फिल्ड सर्व्हेलन्स टीमध्ये त्यांना काम करण्याचे आदेश ३ मे रोजी देण्यात आले होते. मात्र, त्याला त्यांनी नकार तर दिलाच. पण वर वादही घातला होता. एवढेच नाही, तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वरिष्ठांच्या आज्ञेचे उल्लंघन केले होते. महापालिकेच्या तालेरा रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणताच आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरम्यान, कोरोना मृतांवर पिंपरी चिंचवड शहरातील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्काराची महापालिकेने सोय केली आहे. मात्र, त्यासाठी पैसे मागितल्याचा प्रकार नुकताच घडला होता. त्याबाबत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काळेवाडीतील नगरसेविका सुनीता तापकीर यांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्याचीही तत्पर दखल घेत कार्यवाही आणि कारवाईचेही आदेश त्यांनी दिले आहेत. 

महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांनी स्मशानभूमीच्या दर्शनी भागात पारंपारिक पद्धतीच्या अंत्यसंस्कारासाठी कसलेही पैसे आकारले जात नसल्याचा फलक लावण्यास सांगितले आहे. त्याजोडीने त्यांनी पालिकेच्या सुरक्षा विभागाने अचानक गस्त घालून स्मशानभूमींची पाहणी करण्यास सांगितले आहे. त्यानंतरही तेथील कामगारांनी यासाठी पैसे मागितल्याचे आढळल्यास वा तशी तक्रार आल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT