मुख्य बातम्या मोबाईल

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या लेखक व प्रकाशकावर कठोर कारवाई करा : धनंजय मुंडे 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकुर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही तर या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागुन राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 


सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत एक भाषिक पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुरविण्यात आलेल्या समर्थ श्री. रामदास स्वामी यांच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकुर प्रसिध्द करण्यात आला आहे. याप्रकरणी तातडीने या पुस्तकाचे वितरण थांबवून लेखक, प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांनी केली होती. 

त्यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे चे उपसंचालक विकास गरड यांनी काल एक पत्रक काढून सदर पुस्तकाचे वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ पुस्तक वितरणाचे आदेश थांबवून चालणार नाही, तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या लेखक आणि प्रकाशकावर कारवाई केली पाहिजे. तसेच राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT