Pritam munde.jpg
Pritam munde.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने पाथर्डीचे तालुकाध्यक्ष देणार पदाचा राजीनामा

राजेंद्र सावंत

पाथर्डी : केंद्रात खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्रिपद न दिल्याने येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मंत्रिपद मुंडे यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते, तर जनतेसाठी महत्त्वाचे होते. भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे देणार असल्याची माहिती माणिक खेडकर यांनी दिली. (The taluka president will resign as Pritam Munde was not given the ministerial post)

खेडकर म्हणाले, ‘‘केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव शपथविधीपर्यंत आघाडीवर होते. ऐन वेळी असे काय झाले, की मुंडे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. विधान परिषदेवरही पंकजा मुंडे यांना घेण्याचे ठरले आणि ऐन वेळी वंजारी समाजातील अन्य व्यक्तीला आमदार केले गेले. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे मंत्री म्हणून आम्ही स्वागत करतो. मात्र, प्रीतम मुंडे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळायला हवी होती. पंकजा मुंडे यांना एकाकी पाडण्याचा डाव पक्षाचे नेतृत्व खेळत आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.’’

‘‘भारतीय जनता पक्ष वाढविण्यातील (स्व.) गोपीनाथ मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे योगदान पक्षाचे राज्यातील नेतृत्व कसे विसरले? आम्ही भारतीय जनता पक्षाचे पाथर्डीचे सर्वच पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पदांचे राजीनामे देणार आहोत,’’ असे ते म्हणाले.

मुंडे यांना मंत्रिपद टाळल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पाथर्डीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष मुंडे स्वीकारणार की नाकारणार, यानंतरच खरे काय ते समजेल.

कार्यकर्त्यांना नाराजी

भारतीय जनता पक्ष खासदार प्रितम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद देईल, अशी अपेक्षा होती. त्यांना डावलल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत व कार्यकर्त्यामधे नैराश्याचे वातावरण पसरले आहे. गोपिनाथ मुंडे, पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांचा भारतीय जनता पक्षासाठीचा त्याग मोठा आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल अशी आशा होती.

- डॉ. मृत्युंजय गर्जे, नगराध्य़क्ष, नगपरीषद पाथर्डी.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT