adv. rahul zaware.jpg
adv. rahul zaware.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

`तहसीलदार देवरे, सुजित झावरे आणि माळी यांचा हा कट`

Amit Awari

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ नंतर गढूळ झालेले पारनेरचे राजकीय वातावरण काही शांत होत नसल्याची स्थिती आहे. आमदार नीलेश लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्या विरोधात आज पारनेर पोलिस ठाण्यात मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तहसीलदार ज्योती देवरे, भाजपचे नेते सुजित झावरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी राजकीय सूडबुद्धीने दाखल केलेला असल्याचा आरोप अॅड. राहुल झावरे यांनी केला आहे. अॅड. झावरे यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार देवरे यांच्या भ्रष्टाचारा संदर्भात मुंबईतील लोकायुक्तांकडे तक्रार केली होती.

अॅड. झावरे म्हणाले, हा गुन्हा राजकीय द्वेषा पोटी दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होताना तालुक्याच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती देवरे तिथे येऊन गेल्या. तहसीलदार देवरे व सुजित झावरे यांची एक बैठक पारनेरमध्ये झाली. त्यांनी एकत्र नियोजन करून हा गुन्हा दाखल केला. मी लोकायुक्तांकडे तहसीलदार देवरे यांच्या भ्रष्टाचारा संदर्भात तक्रार केल्यामुळे देवरे, सुजित झावरे व बाळासाहेब माळी यांनी माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा...

या गुन्ह्यात तथ्य नाही. राजकीय द्वेषा पोटी गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल करताना हे सर्व एकत्र होते. गुन्हा दाखल करताना तहसीलदार येण्याचे काय कारण? त्यांनी त्यांचे काम तहसील कार्यालयात करावे. त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना स्वतः आल्या. फिर्यादी जवळ बसल्या. फिर्यादी गावातीलच असल्याने त्यांना मी ओळखतो. मात्र फिर्यादी व माझी आज कोठेच गाठभेट झालेली नाही. त्यामुळे हा गुन्हा म्हणजे केवळ राजकीय सूडबुद्धीने केलेला प्रकार आहे, असे स्पष्टीकरण अॅड. राहुल झावरे यांनी दिले आहे.


फिर्यादीत म्हटले आहे की...
मिनीनाथ बर्डे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तासगावातील येडुमाता मंदिरासाठी सभामंडप मंजूर झाला आहे त्यासंदर्भातील माहिती वनकुटे येथे राहुल झावरे यांना विचारली असता त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT