Tejas, son of former MLA Anil Gote, narrowly escaped the accident
Tejas, son of former MLA Anil Gote, narrowly escaped the accident 
मुख्य बातम्या मोबाईल

माजी आमदार अनिल गोटेंचे पुत्र तेजस अपघातातून थोडक्‍यात बचावले 

सरकारनामा ब्यूरो

धुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांचे पुत्र तेजस हे ट्रक व मोटार अपघातातून थोडक्‍यात बचावले. यात त्यांच्या मोटारीचे मोठे नुकसान झाले. नगाव शिवारात ही घटना सोमवारी (ता. 24 ऑगस्ट) घडली आहे. 

तेसज गोटे हे मल्हार बागेतील आपले काम आटोपून मोटारीने धुळे शहरातील खोलगल्लीतील निवासस्थानी निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या पुलावर पंधरा दिवसांपासून मोठा खडडा पडला आहे. पावसाचे पाणी त्यात साचले आहे. खड्डयांचा अंदाज मोटार चालक तेजस गोटे यांना आला नाही.

मोटारीचे पुढचे चाक खड्डयात आदळून त्यांच्या गाडीचा टायर फुटला आहे. त्याच वेळी समोरून भरधाव येणाऱ्या चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रोखला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे तेजस गोटे थोडक्‍यात बचावले. अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. यात कुठलाही घातपात नाही, अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. 

अनिल गोटे हे धुळे येथील माजी आमदार आहेत. ते भाजपमध्ये होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारलीख, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 

हेही वाचा  : 'गोदी मीडिया'कडून कॉंग्रेसमध्ये अस्थिरता घडविण्याचा प्रयत्न 

जळगाव : कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण व्हावा, याबाबतचा निर्णय पक्ष घेईल, त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा इतरांनी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. परंतु कॉंग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी "गोदी मिडीया'कडून षडयंत्र सुरू आहे, असा आरोप कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघाचे शिरीष चौधरी आमदार आहेत. राज्याचे माजी शिक्षण मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) बाळासाहेब ऊर्फ मधुकरराव चौधरी यांचे ते पुत्र आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याबाबतच्या वादाबाबत आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले, की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय अध्यक्षांबाबत जे मत व्यक्त केले आहे, त्यांच्याशी आपण सहमत आहोत. त्यात वाद असण्याचे कारणच नाही. 

कॉंग्रेस पक्षात कोणतेही वाद नाहीत, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, पक्षाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यात नेमके काय म्हटले आहे, याची माहिती नाही. मीडियाला त्याबाबत माहिती झाली आणि त्यांनी याबाबत तर्कवितर्क सुरू केले. त्यावर आधारित आता सर्व सुरू आहे. "गोदी मीडिया'च्या माध्यमातून हे सर्व घडविले जात आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय पक्षाचे नेते व पदाधिकारी एकत्र बसून घेतील. परंतु यात मीडियावर चर्चा घडविण्यात येत असून त्यात भाजपचे नेतेही कॉंग्रेसने हे केले पाहिजे. ते केले पाहिजे हे सल्ले देत आहेत. यांचे मार्गदर्शन मागितले कुणी?  

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT