andolan.jpg
andolan.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाजल्या मंदिरातील घंटा

सरकारनामा ब्युरो

नगर ः कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्याच्या निषेधार्थ नगर मंदिर बचाओ कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना निवेदन देऊन तातडीने सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावी, अन्यथा मंदिर बचाओ कृती समिती तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला.

याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे बापू ठाणगे, जैन मंदिर अध्यक्ष सुभाष मुथा, प्रा.सुनिल पंडित, बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, हरिभाऊ डोळसे आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा...

वसंत लोढा म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देत  आता सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्व मंदिरे बंद आहेत. याचा निषेध मंदिर बचाओ कृती समिती करत आहे. सर्व  देवी-देवतांचे व साधू-संतांचे  मंदिरे हे समस्त हिंदू जणांचे शक्तीस्थळे आहेत. शासनाने भाविकांच्या मानसिकतेचा अंत पाहू नये. शक्ती आणि भक्ती एकत्र आल्यास भाविक उद्रेक करतील.  नगर जिल्ह्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी त्वरित खुली करावी, अन्यथा मंदिर बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

हेही वाचा...

सुभाष मुथा यांनीही मंदिरे त्वरित उघडण्याची मागणी करत मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे सांगितले.

बापू ठागणे, गौतम कराळे यांंनी  देशातील इतर राज्यामध्ये मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत, मात्र महाराष्ट्रात मंदिरे बंद का? असा प्रश्न उपस्थित केला. शांतीलाल कोठारी, राजू पडोळे, विलास देवी, पराग गावडे, सागर होनराव, एस.एस.पाटील, राजेश सटाणकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT