raj29.jpg
raj29.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

प्रश्न खूप आहेत, पण निर्णय होत नाही : राज ठाकरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : वाढीव बिलाबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. आज राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. याबाबततचे निवेदन ठाकरे यांनी राज्यपालांना दिले. "प्रश्न खूप आहेत पण निर्णय होत नाही, " असे राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

राज्यातील वाढीव बिलाबाबत राज ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी आज सकाळी राजभवन येथे गेले होते. मंदीर, अकरावी प्रवेश, वाढीव बील याबाबत यावेळी चर्चा झाली. वाढीव बील येत्या दोन दिवसात कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी राज्यपालांना केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला राज्यपाल कोश्यारी यांनी राज ठाकरेंना दिला. याबाबत लवकरच शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.  

राज ठाकरे म्हणाले, "वाढीव वीज बिलाविषयी रा्ज्यपालांशी चर्चा झाली. हा विषय राज्य सरकारला माहित आहे. सरकार आम्ही वीज बील कमी करू शकतो असे म्हणाले होते, पण या छोट्याश्या निर्णयासाठी इतका वेळ का लागत आहे. याबाबत मी शरद पवार, मुख्यमंत्र्याशी देखील बोलणार आहे. "


हेही वाचा : मुख्यमंत्री ठाकरे द्विधा मनस्थितीत.. पक्ष महत्वाचा की   सरकार..दरेकरांची टीका  
 मुंबई : शिवसेना पक्ष संघटनेला महत्व द्यायचे की सरकारला महत्व द्यायचे हा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक एकहाती लढविण्याची घोषणा केल्याचे मत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याची जाणीव बहुदा मुख्यमंत्री ठाकरे यांना झाली असावी. कारण जेथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या मित्रपक्षांचे आमदार असतील तेथे स्थानिक शिवसैनिक काय काम करणार, त्या कामांचा फायदा कोणाला होणार व त्यामुळे त्यांनी कश्यासाठी व कोणासाठी काम करायचं, हे प्रश्न उपस्थित होत असणार. त्याहीपेक्षा खालच्या पातळीवर म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती जर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या ताब्यात असतील तर तेथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मनातही हाच प्रश्न येत असणार. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे, असेही दरेकर यांनी दाखवून दिले आहे.  


  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT