Antijan test.jpg
Antijan test.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

पारनेरमधील काही दुकाने कोरोना कालावधी संपेपर्यंत राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सरकारनामा ब्युरो

पारनेर : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कडक निर्बंध लादण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ४३ गावे १० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले होते. (Thirteen establishments in Parner will remain closed till the end of Corona period)

अनेक गावांत कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला होता. मात्र, काही गावांत मागच्या दाराने विविध आस्थापना सुरू होत्या. त्या १३ आस्थापनांवर प्रशासनाने कारवाई करत त्या ‘सील’ केल्या. त्या आस्थापना कोरोना कालावधी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा..

जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण तालुक्यात सापडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ४३ गावे संवेदनशील जाहीर केली आहेत. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, त्या गावांत आजपासून कडक लॉकडाउन पाळण्याचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा अनेक गावांत मागच्या दाराने, तर काही ठिकाणी चोरून विविध आस्थापना सुरू असल्याचे समजल्यानंतर, तहसीलदारांच्या पथकाने त्या आस्थापना ‘सील’ केल्या आहेत. या ४३ गावांतील लॉकडाउनवर पाळत ठेवण्यासाठी एक भरारी पथकही तयार केले आहे.
या भरारी पथकाने कारवाई केलेली गावे (कंसात त्या गावात कारवाई केलेल्या आस्थापनांची सख्या) अशी ः पारनेर (दोन), टाकळी ढोकेश्वर (तीन), कान्हूर पठार (दोन), जामगाव (एक), भाळवणी (तीन), वासुंदे (दोन) या प्रमाणे १३ आस्थापना सील केल्या आहेत. या वेळी तहसीलदार देवरे यांच्यासह गटविकास अधिकारी किशोर माने, सहायक पोलिस निरीक्षक हनुमान उगले, तसेच कामगार तलाठी, ग्रामसेवक यांचा समावेश होता.

कडक निर्बंधांमुळे भयाण शांतता

तालुक्यातील वीकएंड लॉकडाउनमुळे सगळीकडे शुकशुकाट होता. ४३ गावांत तर अधिकच कडक निर्बंध लादल्याने भयाण शांतता होती. मात्र, काही गावांत दुकाने व टपऱ्या चोरून सुरू होत्या. तहसीलदारांचे आदेश फक्त व्हॉट्सअॅप व कागदावरच असतात, अशी काहींची भावना झाली आहे. मात्र, नेहमीच्याच लॉकाडाउनला व्यावसायिक पुरते वैतागले आहेत. किती दिवस बंद पाळणार, आम्ही काय खावे, अशी चिंता त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT