Handcuffs
Handcuffs 
मुख्य बातम्या मोबाईल

शाखाप्रमुखावरील गोळीबार प्रकरणी तीन अटकेत

सरकारनामा ब्युरो

भिवंडी : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत असताना काल्हेर गांव मधील रेतीबंदर रोडवरील मांगल्य बंगल्याजवळ  ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या शिवसेना शाखा प्रमुख व त्याच्या पत्नी वर  बेछूट गोळीबार करून पळून गेलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या विशेष पथकाने शिताफीने अटक केली आहे. ७२ तासात गुन्हा उघडकीस आल्याने पोलीस आयुक्त फणसळकर यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

सोनू प्रकाश म्हात्रे (२५ रा.कालवार )  वैभव विजय भोकरे(२५ रा.काल्हेर )  प्रथम किशोर भोईर (२० रा.डोंबिवली )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचा नांव आहेत.भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये सार्वजत्रिक  निवडणूका होत असुन ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षाचे स्थानिक पुढारी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ,मनसे अशा विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचाराची चुरस निर्माण झाल्याने ठिकठिकाणी हाणामारीचे प्रकार घडु लागले असताना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गांवात ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे असलेले शिवसेना शाखाप्रमुख दिपक म्हात्रे हे तीन दिवसापूर्वी आपल्या पत्नी सह ठाणे येथे जाऊन रात्री उशिरा घरी परत येऊन घरा जवळ गाडी पार्क करून घरात पत्नी सह प्रवेश करीत असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोघा इसमांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला झालेल्या प्रकाराचा छडा लावणसाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या प्रकाराची निरखून तपासणी केली. त्यात संशयित आरोपी निष्पन्न झाले. 

सदर तपास ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या विशेष पोलीस पथकाचे भिवंडी पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी ठाणे पोलीस पथकासह समांतर तपास करीत तीन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या गुन्हेगारांनी गुन्हा कबुल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्हेगारांनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काल्हेर गोळीबाराचा  सूत्रधार कोण आहे? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. 
Edtied By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT